Morning Session

6:00Am Get Up
6.00 To 6.30 AM Morning Activities
6.30 To 7.30 AM Yoga
7.30 To 9.30 AM Bath and Break fast

Afternoon Session

9.30 To 12.30 PM GD, Role Play, Counseling
12.30 To 1.30 PM Launch
1.30 To 3.00 PM Rest
3.00 To 7.00 PM Therapy session

Evening Session

7.00 To 8.00 PM Reading and Play
8.00 To 9.00 PM Dinner
9.00 To 10.00 PM T.V./Playing/Singing
10.00 PM Sleep

आमच्याबद्दल

मानसिक आरोग्य : एक झाकला गेलेला ज्वलंत निखारा 

भारतीय समाजात,
• विभक्त कुटुंब पद्धती,
•प्रत्येक क्षेत्रात तसेच प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तींना ग्रासलेली गळेकापू स्पर्धा
• आयुष्याकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा आणि साधनांची कमतरता आणि त्यातून निर्माण होणारे ताण - तणाव
• कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर कमी झालेला संवाद
• मानसिक आजारांबद्दल असलेले अज्ञान आणि ब-याच वेळा केले गेलेले दुर्लक्ष
• समाजामध्ये समजला जाणारा कलंक आणि अंधश्रद्धा .

या व अशा अनेक कारणांमुळे मानसिक आजारांसंबंधीचे प्रश्न अधिक गंभीर होत जातात आणि पर्यायाने त्यामध्ये रुग्ण, त्याचे कुटुंबीय आणि एकंदर समाजच कमी अधिक प्रमाणात होरपळला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात जवळजवळ १०% लोकसंख्या वेगवेगळ्या मानसिक आजारांनी ग्रस्त बनली आहे. इतकेच नव्हे, तर ० ते १८ वयोगटामधील १४% मुले मानसिक आजाराने पछाडलेली आहेत. हि अत्यंत गंभीर आणि आत्यंतिक काळजीची बाब आहे.

जेंव्हा एखादा व्यक्ती मनोरुग्ण होतो तेंव्हा नक्की काय होते?
  • डिप्रेशन, फोबिया, अंक्झायटी, सीझोफ्रेनिया, सायकोसिस सारख्या आजारात प्रथमतः पूर्णपणे दुर्लक्षच केले जाते. त्यामुळे या आजारांची मुले घट्ट होतात आणि आजारातील गुंतागुंत वाढत जाते. .
  • अंधश्रद्धा तसेच सामाजिक काळीम्याच्या भावनेमुळे मानसोपचार तज्ञाकडे जाणे टाळले जाते.
  • आजार झाल्यानंतर हळूहळू रुग्णाचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे त्याचे कामाच्या ठिकाणाचे / अभ्यासातली एकाग्रता कमी होऊ लागते. काम/ अभ्यास करताना वारंवार चुका होऊ लागतात. यामुळे रुग्णाच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ लागतो. रुग्ण गैरहजर राहण्याच्या प्रमाणात वाढ होते आणि त्यानंतर तो कामावर/शाळा - कॉलेजला जाणे बंद करतो.
  • मानसिक आजाराबद्दल पुरेशी कल्पना नसल्यामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र यांचे रुग्णाबरोबर वाद / मतभेद सुरु होतात आणि पर्यायाने रुग्णाच्या आजारात वाढ व्हायला लागते.
  • काहीवेळा रुग्ण आक्रमक होतो किंवा काहीवेळा पूर्णपणे विनमस्क होतो. ब-याचवेळा रुग्णाच्या मनात आत्महत्येचे विचार प्रबळ होऊ लागतात. थोडक्यात रुग्ण हा वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर मागे पडू लागतो. .

प्रश्न

भावनिक प्रश्न

औदासिन्य / खिन्नता, अवास्तव चिंता, विकृत मनस्थिती, विचार आणि कृती यात फारकत

कौटुंबिक प्रश्न

मानसिक आजाराच्या स्वरूपाबद्दल पूर्णपणे माहिती नसल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्राबरोबर वाद-विवाद आणि वितुष्ट

वर्तणुकीचे प्रश्न

मौखिक आणि शारीरिक आक्रमकतेमध्ये वाढ , आत्महत्येचे प्रबळ विचार

 

वैयक्तिक

वैयक्तिक -हास

• एकाग्रतेचा अभाव

• गमावलेला आत्मविश्वास

• झोप, भूक आणि संभोग शक्तीमध्ये घट

सामाजिक

सामाजिक -हास

• कमी झालेला संवाद

•- कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांच्याशी कमी झालेले संबंध

- कामाच्या / शिक्षणाच्या ठिकाणी जाणे कमी / बंद

आर्थिक

आर्थिक -हास

• कामाच्या ठिकाणी योग्य संवादाचा अभाव - काहीवेळा वाद

• नोकरी / व्यवसाय बंद पडणे

 

Not sure what to do?

The advice Nurse will help you figure it out

Make an appointment